वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ४. संत नामदेव गाथा :- भाग ४ › 200. जनास उपदेश

एक तत्त्व त्रिभुवनी

🙏 4. संत नामदेव · ABH-082290 · अभंग क्र. १९४०

1940.
एक तत्त्व त्रिभुवनी | दुसरे न धरी तू मनी ॥१॥
म्हणे का नरहरि नारायण | मग तुज गांजिल कवण ॥२॥
दोन मनी जरी तू धरिसी | तरी वाया दंडिला जासी ॥३॥
त्रिविध भक्ती चराचरी | तयामाजी एक तू करी ॥४॥
चहू वेदी जे बोलिले | ते तू करी वा उगले ॥५॥
पंच-इंद्रियांचा संग | त्यांचा नको करू पांग ॥६॥
साही चक्री मन पवन | तेथे नव्हे आत्मनिधान ॥७॥
सप्त स्वरो करी कीर्तन | आणिक न लगे रे साधन ॥८॥
अष्टही गुण सात्विक पूजा | भावे भजा गरुडध्वजा ॥९॥
नवही द्वारे दंडिती | पुनरपि कोठे कैचि भक्ति ॥१०॥
दाही दिशा अवलोकिता | दिवस गेले मोजिता ॥११॥
अकरा रुद्र जाले जरी | तरी एकचि श्रीहरि ॥१२॥
वारा मास आणि पक्ष | व्यर्थ जाती दे तू लक्ष ॥१३॥
तेरा गुणांचा तांबूल | समर्पावे पूगीफल ॥ १४ |
चौदा भुवने ज्याचे पोटी | त्याचे नाम धरा कंठी ॥१५॥
पंधरा दिवसा एकादशी | करा जागर उपवासी ॥१६॥
पोडश उपचारे पूजा | भावे भजा गरुडध्वजा ॥१७॥
सत्रावी जीवनकळा | तिचा घे कांरे सोहळा ॥१८॥
अठरा पुराणे वानिसी | निरंतर कृष्णकीर्ति | १९ ॥
म्हणे विष्णुदास नामा | शरण जावे पुरुषोत्तमा ॥२०॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग