वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ४. संत नामदेव गाथा :- भाग ४ › 200. जनास उपदेश

दाही दिशा फेरे कष्टव

🙏 4. संत नामदेव · ABH-082320 · अभंग क्र. १९४३

1943.
दाही दिशा फेरे कष्टविसी सैरा | किती येरझारा कल्पकोटी ॥१॥
विठ्ठलाचे नामी दृढ धरी भाव | येर सांडी बाब मृगजळ ॥२॥
भक्ति मुक्ति सिद्धि जोडोनिया कर | करिती निरंतर वोळगण ॥३॥
नामा म्हणे मना धरी मे विश्वास | मग तुज गर्भवास नव्हे नव्हे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग