अवघे सावधान होऊनि वि
1965.
अवघे सावधान होऊनि विचारा | सोडवण करा संसाराची ॥१॥
अवघा काळ वाचे म्हणा नारायण | वाया एक क्षण जाऊ नेदी ॥२॥
अवघे हे आयुष्य सरोनि जाईल | मग कोण होईल साह्य तुम्हा ॥३॥
अवघा हा प्रपंच जाणोनि लटिका | शरण रिघा एका पंढरिराया ॥४॥
अवधे मायामोहे गुतलेती पहा | अवधे सहज आहा ब्रह्मरूप ॥५॥
नामा म्हणे अवघे सुखाचेचि व्हाल | जरी मन ठेवाल विठ्ठलपायी ॥६॥
1966
जळी बुडबुडे देखता देखता | क्षण न लागता दिसेनाती ॥१॥
तैसा हा संसार पाहता पाहता | अंतकाळी हाता काई नाही ॥२॥
गारुड्याचा खेळ दिसे क्षणभर | तसा हा समार दिसे खरा ॥३॥
नामा म्हणे तेथे काही नसे बरे | क्षणाचे हे सर्व खरे आहे ॥४॥
