माहेरींची वास पाहीन
1943.
माहेरींची वास पाहीन मी डोळा संतांचा पै मेळा येता देखे ॥१॥
घालुनी दंडवत लागेन मी पायी । जीव हा उतराई करुनी सांडी ॥२॥
कुर्वडीन काया तयावरुन भावे । जीवे वोवाळावें जीवलगा ॥३॥
आषाढी कार्तिकी प्रेमे करिती वारी । तयांची मी थोरी काय वानु ॥४॥
एका जनार्दनी धन्य ते दैवाचे । निरंतर वाचे विठ्ठलनाम ॥५॥
