गौळियाचे घरी कैवल्या
1954.
गौळियाचे घरी कैवल्याचे दानी | परब्रह्म अंगणी क्रीडतसे ॥१॥
ऐसे कांही करा आलेनो संसारा | जेणे जोडे सोयरा पांडुरंग ॥२॥
करिता त्याचे काज मनी न धरी लाज | म्हणे हे शरण मज सर्व भावे ॥३॥
राखे बळिचे द्वार पाहे त्याची वास | म्हणे हा माझा दास अंतरंग ॥४॥
गोवळयाचे उच्छिष्ट मनी न धरी वीट | आवडी निकट गोपाळाची ॥५॥
तरीच क्रिया कर्म केले होये सफळ | जरी हृदयी गोपाळ येऊनि राहे ॥६॥
येरी ते मायावी जग भुलवणी | नित्य विभांडणी सर्वभावे ॥७॥
नामा म्हणे ऐसे संतांचिया सोई | विठोबाचे पायी भेटी मन ॥८॥
