जेथे जेथे मन जाईल वा
1953.
जेथे जेथे मन जाईल वासना । फिरवावें नारायण हेचि देई ॥१॥
वारंवार द्यावा नामाचा आठव । कुबुद्धिचा ठाव पुसा सर्व ॥२॥
भेदाची भावना तोडावी कल्पना । छेदावी वासना समूळ कंद ॥३॥
एका जनार्दनी नका दुजा छंद । रामकृष्ण गोविंद आठवावा ॥४॥
