रामनाम म्हणता संसारा
1942.
रामनाम म्हणता संसाराचे भय | म्हणती त्याच्या होय जिन्हे कुष्ट ॥१॥
अमृत सेविता केचे ये मरण| जाणती हे खूण अनुभवी ॥२॥
ज्याची एकवृत्ति रामनामी प्रीति | असता कैसे होती गर्भवास ॥३॥
नामा म्हणे नामी दृढ भाव धरा | आत्महित करा जाणते हो ॥४॥
