विठ्ठल विठ्ठल वदता व
1052.
विठ्ठल विठ्ठल वदता वाणी ।
चक्रपाणी संतोषे ॥१॥
म्हणोनिया लाहो करा ।
अहो अवधारा अवघेहि ॥२॥
येणेचि नामे वैकुंठासी ।
गेले पापरासी बहु मार्गे ॥३॥
निळा म्हणे सांगती संत ।
उभवुनी आत पुराणांतरी ॥४॥
1052.
विठ्ठल विठ्ठल वदता वाणी ।
चक्रपाणी संतोषे ॥१॥
म्हणोनिया लाहो करा ।
अहो अवधारा अवघेहि ॥२॥
येणेचि नामे वैकुंठासी ।
गेले पापरासी बहु मार्गे ॥३॥
निळा म्हणे सांगती संत ।
उभवुनी आत पुराणांतरी ॥४॥