सांगेल खूण परि हे न
1063.
सांगेल खूण परि हे न कळे ।
नुघडता डोळे बुध्दीचे ॥१॥
याचिलागी चित्तशुध्दी ।
करा हो उपाधी निरसुनी ॥२॥
दावितांही न दिसे वर्म ।
ठाके त्या कर्म आड उभे ॥३॥
निळा म्हणे दोषा धुणी ।
गर्जवा वाणी हरिनामे ॥४॥
1063.
सांगेल खूण परि हे न कळे ।
नुघडता डोळे बुध्दीचे ॥१॥
याचिलागी चित्तशुध्दी ।
करा हो उपाधी निरसुनी ॥२॥
दावितांही न दिसे वर्म ।
ठाके त्या कर्म आड उभे ॥३॥
निळा म्हणे दोषा धुणी ।
गर्जवा वाणी हरिनामे ॥४॥