वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 151. श्री ज्ञानेश्वर समाधी

सारासार विचार करिती

🙏 4. संत नामदेव · ABH-081797 · अभंग क्र. १०५०

1050.
सारासार विचार करिती अवघे जन | हे ज्ञान अंजन दाविले डोळा ॥१॥
पाहिले गे माय अंतरीचे सुख | वैकुंठ नायक उभा असे ॥२॥
ज्ञानदेवायोगे सकळांशी दर्शन | परब्रह्म निधान डुल्लतसे ॥३॥
वोसंडले देव पाहोनिया प्रेम | डुल्लती सप्रेम अनुभवे ॥४॥
अवघे जन कोडे घालिती सांकडे | सांगावे निवाडे नामयाचे ॥५॥
देव म्हणे नामा विचारिले आम्हा | ते का संधी तुम्हा कळली नसे ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग