विनविति संत आणिक सज्
1065.
विनविति संत आणिक सज्जन | नव्हे समाधान कांही केल्या ॥१॥
नानाचि प्रकार करितसे घोर | कांही केल्या स्थिर चित्त नव्हे ॥२॥
काय पाहावे याला विरक्त पुरुषाला | स्वरूपी मिळाला ज्ञानदेव ॥३॥
नामा म्हणे यांचे उचंबळले प्रेम | म्हणोनि परब्रह्म मागे पुढे ॥४॥
