वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 151. श्री ज्ञानेश्वर समाधी

उदित जाले मन आता काय

🙏 4. संत नामदेव · ABH-081801 · अभंग क्र. १०४९

1049.
उदित जाले मन आता काय अनुमान | करी शीघ्र प्रस्थान आज्ञा माझी ॥१॥
देवाचा हो कर धरोनी ज्ञानेश्वर | निघाला बाहेर योगिराज ॥२॥
मागे पुढे संत चालिले मिरवित | कौतुक पहात इहलोकी ॥३॥
नारा विठा गोंदा माहादा विरक्त | परसा भागवत उभे तेथे ॥४॥
समुदाय वैष्णव मिळालासे भारी | महोत्सव गजरी आरंभिला ॥५॥
नामा म्हणे गुज दाविले श्रीहरी | धन्य आळंकापुरी पुण्यभूमी ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग