अल्याड पल्याड पताकां
1045.
अल्याड पल्याड पताकांचे भार | मध्ये मनोहर इंद्रायणी ॥१॥
पिवळ्या पारव्या आणिक हिरव्या | निळवर्ण सार्या लखलखित ॥२॥
जरी जर्तारी जाल्या रानभरी | विजा त्यावरी खेळताती ॥३॥
सर्पाकार दंड तारांगणावाणी | पताका तिकोनी दाटताती ॥४॥
नामा म्हणे तेथे पताकांचे भार | केव्हडे भाग्य थोर ज्ञानोबांचे ॥५॥
