सकळ मंत्रांमाजी मंत्
1056.
सकळ मंत्रांमाजी मंत्र उत्तम ।
दोंनी अक्षरे जगता राम ।
निरसोनिया मायादि भ्रम ।
पाविजे निजधाम अनायसे ॥१॥
तैसाचि मंत्राराज प्रसिध्द ।
त्रि अक्षरी जपता गोविंद ।
नरनारी बाळके शुध्द ।
पावती अच्युतपदाते ॥२॥
चतुराक्षरी मंत्र सरळ ।
जपता नारायण श्रीगोपाळ ।
चतुर्भज होती सकळ ।
स्वरुपता पावती ॥३॥
त्रि अक्षरी मंत्रसार ।
विठ्ठल नामाचा उच्चार ।
निळा म्हणे करिता नर ।
न ये समोर कळीकाळ त्या ॥४॥
