साडेतीन पाउले टाकिली
1053.
साडेतीन पाउले टाकिली निश्चळ | नेमियेले स्थळ उत्तरायणी ॥१॥
देव म्हणे ज्ञाना होई सावधान | माग वरदान मज काही ॥२॥
ज्ञानदेव म्हणे शुद्ध कार्तिक मासी | व्रत एकादशी स्वामीकडे ॥३॥
कृष्णपक्षी व्रत हरिदिन परिपूर्ण | मागितला मान ज्ञानदेवे ॥४॥
नामा म्हणे देवा आवडीने देता | जोडले हे संता पियुष जे ॥५॥
