अनुभव हा सागर गुह्य
1059.
अनुभव हा सागर गुह्य आणि ब्रह्म | उघडे अध्यात्म बोलियेले ॥१॥
प्रगट हे गुह्य उकलिले गाबाळ | केले करतळमळ ज्ञानयाने ॥२॥
कोणाची कल्पना नुरेचि बा येथे | उघडा गुहयार्थ सिद्ध केला ॥३॥
करणे न करणे सांगितला पंथ | तिही लोकी कीर्त वाढविली ॥४॥
ज्ञान हे अंजन साधी संजीवनी | नामा म्हणे यांनी ख्याती केली ॥५॥
