धन्य इंद्रायणी पिंपळ
1044.
धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार | धन्य ज्ञानेश्वर पुण्यभूमी ॥१॥
धन्य भागिरथी मनकर्णिका वोघा | आणिक हो गंगा त्रिवेणी त्या ॥२॥
धन्य ऋषीश्वर धन्य पांडुरंग | मिळाले ते सांग आळंकापुरी ॥३॥
नामा म्हणे धन्य भाग्याचे हे संत | जाला पहा एकांत ज्ञानोबाचा ॥४॥
