स्वानंदे देवभक्ता भे
1048.
स्वानंदे देवभक्ता भेटी | वोरसोनि कंठी आलिंगावे ॥१॥
देव म्हणे भले आठवले तुज | ते हे संधी मज कळली असे ॥२॥
पदपदांतरे केला मार्ग सोपा | त्यांत माझी कृपा वोळली असे ॥३॥
देव म्हणे तुझी पुरविन आळी | सुखी सही मंडळी वैष्णवांची ॥४॥
नामा म्हणे देवा आज्ञा देगा यासी | नेणू काय आम्हांसी आरंभिले ॥५॥
