कोण जाणे माझे जीवींच
1057.
कोण जाणे माझे जीवींचा कळवळा | प्रेमाश्रु डोळा लोटताती ॥१॥
अवघियांचे मन दूषित तटस्थ | लहान थोर संत वोसंडती ॥२॥
तारीयेले जड बा माझ्या कीर्तनी | आठवती मनी गुण तुझे ॥३॥
नामा म्हणे येथे बोलवेना मज | जातसे निजगुज आवडीचे ॥४॥