दत्तात्रय नाम ज्याचे
1054.
दत्तात्रय नाम ज्याचे नित्य मुखी । तया समसुखीं नाही दुजा ॥१॥
भावे दत्त दत्त म्हणतसे वाचे । कळिकाळ त्याचे पाय वंदी ॥२॥
दत्ताचें पै रुप ज्याचे वसे नेत्री । आहिक्य परत्री तोचि सुखी ॥३॥
गुरु दत्ताराया देई आलिंगन । तयासी वंदन करिती सर्व ॥४॥
दत्तरायाची जे करिताती यात्रा । त्याचेनीं पवित्र होते तीर्थ ॥५॥
ज्याचे चित्ती वसे गुरुदत्त ध्यान । त्याचेनि पावन तिन्ही लोक ॥६॥
दत्तालागी अपीं तन मन धन । परब्रह्मा पुर्ण तोचि झाला ॥७॥
दत्तचरण तीर्थ जो का नित्य सेवी । उगवितो गोवी प्रपंचाची ॥८॥
दत्तावरुनियां कुरवंडी काया । तयाचिया पाया मोक्ष लागे ॥९॥
एका जनार्दनी मुखी दत्तनाम । हरे भवश्रम क्षणामाजीं ॥१०॥
