वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 151. श्री ज्ञानेश्वर समाधी

वोसंडोनी हरि आनंदला

🙏 4. संत नामदेव · ABH-081780 · अभंग क्र. १०५४

1054.
वोसंडोनी हरि आनंदला तेथे | पुण्य हे अगणित सांगितले ॥१॥
सर्वांगालागी न्याहाळिले परिपूर्ण | केले निंबलोण आवडीने ॥२॥
आळंकापुरी कोणी करील कीर्तन | तयालागी येणे वैकुंठीचे ॥३॥
अस्ति नास्ति उदकी करिल ब्रहरूप | कोटी कुळांसहित उद्धरीन ॥४॥
जेथे ज्ञानदेव तेथे मी निशिदिनी | येथे सुखे ज्ञानी डुल्लताती ॥५॥
नामा म्हणे आता वोसंडले हरी | जडमूढावरी कृपा केली ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग