वाचे उच्चारिले नाम ।
1049.
वाचे उच्चारिले नाम ।
ह्रदयी धरुनिया प्रेम ॥१॥
तेचि बीज फळा आले ।
रुप दृष्टीगोचर झाले ॥२॥
कळासले ध्यानी मनी ।
दिसे तेचि जनी वनी ॥३॥
निळा म्हणे पंढरीनाथ ।
अंतरबाह्य जेथे तेथे ॥४॥
1049.
वाचे उच्चारिले नाम ।
ह्रदयी धरुनिया प्रेम ॥१॥
तेचि बीज फळा आले ।
रुप दृष्टीगोचर झाले ॥२॥
कळासले ध्यानी मनी ।
दिसे तेचि जनी वनी ॥३॥
निळा म्हणे पंढरीनाथ ।
अंतरबाह्य जेथे तेथे ॥४॥