याचि अनुष्ठाने ध्रुव
1045.
याचि अनुष्ठाने ध्रुव आणि प्रल्हाद ।
भोगिताती पद वरिष्ठ ते ॥१॥
जेथे नाही होणे निमणे संसारा ।
काळाचा आडदरा अनोळख ॥२॥
शुका नारदासी हाचि नित्य जप ।
जिव्हेसी अलाप हरिनामाचे ॥३॥
निळा म्हणे तेहि झाले हरिच्या ऐसे ।
नाम निजध्यासे महिमा ऐसा ॥४॥
