वन वृक्ष वल्ली ईश्वर
1055.
वन वृक्ष वल्ली ईश्वरासमान | ऋषि मुनिजन राहाती जेथे ॥१॥
होऊनिया पक्षी कपोद कोकिळा | वेष्टियेले स्थळा ब्रह्मबोधे ॥२॥
मृत्तिका पाषाण पंचक्रोशीचे खडे | जाले पहा धडफुडे ब्रह्मरूप ॥३॥
पंचमहापातकी गेले आळंकापुरी | न चले त्याजवरी काळ यम ॥४॥
सांगताती देव ऐकती रुक्मिणी | नामा म्हणे चक्रपाणि वर दिला ॥५॥
