वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 61. दत्तमानसपूजा - अभंग १०५६ ते १०७०

साती भागीरथी सत्रावी

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085607 · अभंग क्र. १०६१

1061.
साती भागीरथी सत्रावीची धार । सुभाक्ति ते मकर समर्पिली ॥१॥
अर्पियले स्नान झाले समाधान । मनाचे उन्मन होऊनियां ॥२॥
चित्त हे शीतळ गेली तळमळ । पाहिले निढळ अमूर्तासी ॥३॥
एका जनार्दनी केला जयजयकार । अत्रीवरद थोर तिन्ही लोकी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग