कैलासाचा वास अधिक सि
1046.
कैलासाचा वास अधिक सिद्धबेट | विष्णूचे वैकुंठ पुरातन ॥१॥
भूमीवरी पंढरी तैसी आळंकापुरी | पंच कोशावरी पुण्यभूमी ॥२॥
सुखाची हे मूर्ति नीलकंठ लिंग | चक्रतीर्थ संग मोक्ष भेटे ॥३॥
परमार्थ सुअर्थ देखतांची संत | सांगितली मात अनुभवाची ॥४॥
नामा म्हणे देवा हे स्थळ चांगले | चित्त मन रंगले ज्ञानोबाचे ॥५॥
