जो जो जो जो रे निज आ
4.
जो जो जो जो रे निज आया । हालविती अनुसुया ॥धृ॥
पालख पुरुषार्थ चौकोनी । भक्तिनाडी गुंफोनी ।
दोरी प्रेमाची लाउनी । शांती गाती गाणी ॥१॥
करिता उप्तत्ति शिणलासी । विश्रांति आलासी ।
निज रे ब्रम्हाया तपलासी । कमळोद्भव जालासी ॥२॥
लक्ष्मीपति निज हो घनःश्यामा । सांडोनि वकुंठधामा ।
प्रतिपाळ करी हो जीव नामा । दर्शन दिले आम्हा ॥३॥
पार्वतीरमण शिवा निज आता । संहारक जीवजंता ।
निजरुप निगमा हो आदिनाथा । एका जनार्दनी दाता ॥४॥
