गाणे जरी म्हणो तरी ग
4.
गाणे जरी म्हणो तरी गणेश शारदा । आणीक नाही दुजा यावांचुनी ॥१॥
नाचेन म्हणू जरी तांडव महेश्वरु । तोही नृत्य करु जाणे एक ॥२॥
बोलू म्हणो जरी बोलके वाचा चारी । ( म्ह.चारीवेद ) त्या एकाची उरी मग मी बोलो ॥३॥
जाणो म्हणे जरी अठराहि जाणे । त्या पै काय उणे मग मी जाणो ॥४॥
कळावंत म्हणोंजरी चंद्रसूर्य दोन्ही । बारा सोळा गगनी दाविताती ॥५॥
नामा म्हणे अवघे वेंचले । केशवे आपुले म्हणावे माते ॥६॥
