संत मुक्ताबाई अभंग –
४.
संत मुक्ताबाई अभंग – कूट अभंग
40.
देउळाच्या कळशीं नांदे एक ऋषी |
तया घातली पुशी योगेश्वरीं ॥१॥
दिवसा चांदिणे रात्री पडे उष्ण |
कैसेंनी कठिण तत्त्व जालें ॥२॥
ऋषीं म्हणे चापेकळिकाळ मैं कांपे |
प्रकाश पिसे मनाच्या धारसें एक होय ॥३॥
एकट एकले वायांचि पै गुंफलें |
मुक्त में विठ्ठले सहज असे ॥४॥
वैकुंठ अविट असोनि प्रकट वायांचि |
आडवाट मुक्ताई म्हणे ॥५॥
४१.
मुंगी उडाली आकाशीं |
तिणे गिळिले सूर्याशीं ॥१॥
थोर नवलाव जाहला |
वांझे पुत्र प्रसवला ॥२॥
विंचु पाताळाशी जाय |
शेष माथां वंदी पाय ॥३॥
माशी व्याली घार झाली |
देखोन मुक्ताई हांसली ॥४॥
