बोलावा विठ्ठल पहावा
4.
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल । करावा विठ्ठल जीवभाव ॥१॥
येणे सोसे मन जाले हांवभरी । परती माघारी घेत नाही ॥२॥
बंधनापासूनि उकलल्या गांठी । देता आली मिठी सावकाशे ॥३॥
तुका म्हणे देह भारिला विठ्ठले । कामक्रोधे केले घर रीते ॥४॥