न बोलेचि काही इसी का
5.
न बोलेचि काही इसी काय झाले । भूते झडपिले निश्र्चयेसी ॥१॥
माझिये अदृष्टी नाही हा नंदन । म्हणोनिया विघ्न ओढवले ॥२॥
निवारी हे विघ्न वैकुंठनायका । रक्षी या बाळका सुदर्शने ॥३॥
तुझा मी किंकर आजि अंबुजाक्षा । द्यावी मज भिक्षा हेचि आता ॥४॥
नामाचा उच्चार ऐकतांचि कानी । नेत्र उघडोनि पाहती झाली ॥५॥
राजा म्हणे का हो ऐसी अवस्था । का हो भ्रम चित्ता झाला असे ॥६॥
विश्वाचा मी आत्मा स्वये असे राम । मजमाजी भ्रम कैचा असे ॥७॥
अवतार महिमा वाणी वेद माझा । सुरवरांच्या काजा नामा म्हणे ॥८॥
