वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 7. संत निवृत्तीनाथ › 1. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा › १. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४ › १. संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा

पाहता साधन विठ्ठल की

🙏 7. संत निवृत्तीनाथ · ABH-090055 · अभंग क्र. ४

4.
पाहता साधन विठ्ठल कीर्तन । भक्त संजिवन आत्माराम ॥१॥
विठ्ठल सधर भिवराते नीर । नाम निरंतर केशवाचे ॥२॥
शिव सुरवर चिंतिती सुस्वर । कीर्तन विचार पंढरीसी ॥३॥
निवृत्ति कीर्तन दिननिशी ध्यान । मनाचे उन्मन इये रुपी ॥४॥

अर्थ:
ईश्वर प्राप्तीची अनेक साधने आहेत पण कीर्तन ह्या साधनामुळे भक्त आत्मारामाला प्राप्त करुन अमर होऊ शकतात. भक्त त्यासाठी चंद्रभागेत स्नान करुन बाह्य सुर्चिभूतता व तेच जल जठरात घेऊन आतील सुर्चिभूतता करुन सतत विठ्ठल नामाचे संकीर्तन करतात. आदिनाथ महादेव सर्व देवांना सोबत घेऊन सुस्वरे पंढरी क्षेत्रात कीर्तन करत असतात. निवृत्तीनाथ म्हणतात मी रात्रंदिवस संकीर्तन करुन माझे मन उन्मनी अवस्थेत विठ्ठल स्वरुपाला प्राप्त होते.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग