तू माझी माउली मी वो
4.
तू माझी माउली मी वो तुझा तान्हा । पाजी प्रेमपान्हा पांडुरंगे ॥१॥
तू माझी माउली मी तुझे वासरु । नको पान्हा चोरु पांडुरंगे ॥२॥
तू माझी हरिणी मी तुझे पाडस । तोडी भवपाश पांडुरंगे ॥३॥
तू माझी पक्षिणी मी तुझे अंडज । चारा घाली मज पांडुरंगे ॥४॥
नामा म्हणे होसी भक्तीचा वल्लभ । मागे पुढे उभा सांभाळिसी ॥५॥
