वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

कन्यादान घडो हा अर्थ

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-075864 · अभंग क्र. ४

4.
कन्यादान घडो हा अर्थ पाहोन ।
करावया लग्न द्विज आले ॥१॥
तव अकस्मात प्राक्तनासारिखा ।
सिऊराचा सखा येक आला ॥२॥
पूर्विल सोयरा लग्नाचा इच्छक ।
विवेक की ) पाठक रत्न नामी ॥३॥
लाउनी मागणे केले वाक्प्रदान ।
नेमुनिया लग्न संपादिले ॥४॥
तव बंधू जाला माझ्या पाठीवरी ।
अनुष्ठाना करी पूर्वीचिया ॥५॥
म्हणती हे सभाग्य बंधू पाठीवरी ।
जाला हे निर्धारी गुण इचा ॥६॥
बहेणि म्हणे णेसी जाली वर्षे तीन ।
त्यापुढे जे होणे तेही बोले ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग