दशरथ राजा उठिला तेथू
4.
दशरथ राजा उठिला तेथूनी । कौसल्येसदनी जाता झाला ॥१॥
पाहातसे दृष्टी तेव्हा श्रावणारी । न माये अंतरी तेज तिचे ॥२॥
तुझिये मानसी होती जे डोहाळे । सांग वो वेल्हाळे मजपासी ॥३॥
उदरांत असे भक्तांचा कैवारी । तेथे उरी देहभावा ॥४॥
सदा समाधिस्थ रामरुप झाली । कौसल्या माऊली नामा म्हणे ॥५॥
