उपदेशपर
४.
उपदेशपर
२१.
हित व्हावे मनासीं । दवडा दंभ मानसी ॥१॥
अलभ्यलाभ येईल हाता । शरण जावे पंढरिनाथा ॥२॥
चित्त शुद्ध करा । न देई दुजियासी थारा ॥३॥
हेंचि शस्त्र निर्वाणीचें । सेना म्हणे धरा साचे ॥४॥
२२.
करिसी खटपटी । पोटासाठीं आटा आटी ॥१॥
नाम घेतां विठोबाचें । काय तुझ्या वाचे वेंचे ॥२॥
धनाचिया आशा । वाउगा फिरसी दाही दिशा ॥३॥
जावे हरिकीर्तना । आवडेचि तुझ्या मना ॥४॥
सेना म्हणे ऐसा नरा । जवळूनि दूर करा ॥५॥
२३.
धन कोणा कामा आले । पहा विचारूनि भले ॥१॥
ऐसे सकळ जाणती । कळोनियां आंधळे होती ॥२॥
स्त्रिया पुत्र बंधु पाही । त्याचा तुझा संबंधु नाही ॥३॥
सखा पांडुरंगाविण । सेना म्हणे दुजा कोण ॥४॥
