अनादी निर्गुण प्रगटल
4.
अनादी निर्गुण प्रगटली भवानी ।
मोह महिषासुर मर्दना लागोनी ।
त्रिविध तापांची करावया झाडणी ।
भक्तांलागी तू पावसी निर्वाणी ॥१॥
आईचा जोगवा जोगवा मागेन
द्वैत सारुनी माळ मी घालीन ।
हाती बोधाचा झेंडा मी घेईन ।
भेद रहित वारीसी जाईन ॥२॥
नवविध भक्तिच्या करीन नवरात्रा ।
करुनि पोटी मागेन ज्ञानपुत्रा ।
धरीन सद्भाव अंतरींच्या मित्रा ।
दंभ सासऱया सांडिन कुपात्रा ॥३॥
पूर्ण बोधाची घेईन परडी ।
आशा तृष्णेच्या पाडीन दरडी ।
मनोविकार करीन कुर्वंडी ।
अमृत रसाची भरीन दुरडी ॥४॥
आता साजणी झाले मी निःसंग ।
विकल्प नवऱ्याचा सोडियेला संग ।
काम क्रोध हे झोडियेले मांग ।
केला मोकळा मारग सुरंग ॥५॥
ऐसा जोगवा मागुनी ठेविला ।
जाउनि नवस महाद्वारी फेडिला ।
एकपणे जनार्दनी देखियेला ।
जन्ममरणाचा फेरा चुकविला ॥
अर्थ:
आज नाथांनी जोगवा मागीतलाय आई भवानी कड़े... आणि तो ही सर्वांसाठी. ते म्हणतात की.. हे आई भवानी विठाइ... तुझा गोंधळ घातला आई.. तू प्रसन्न झालिस आई. तू प्रकट झालिस आई. आता तू ह्या भक्तांना पाव आई... आणि तू अशीच पावली स तर ना... *आई तुझा नियमित जोगवा मागेन आई. तुझा जोगवा मागेन*
या भक्तांचा मोह रूपी महिषासुर मारून टाक आई.. त्यांच्यातील तीन ताप ( *रज तम सत्व*)या गुणांची झाड़नी करून टाक आई आणि तुझ्या नगरात जाण्यासाठी जे योग्य आहे तेव्हडेच ठेव आई अस जर् केलस् ना *आई तुझा नियमित जोगवा मागेन आई. तुझा जोगवा मागेन*
त्या साठी आई मी भेदा भेद करणार नाही. द्वयेत् करणार नाही ते सांडून टाकिन आई... त्यासाठी समर्थ सद्गुरु कडून तुझ्या नामाच्या बोधाचा झेंडा हाती घेइन्. आणि तुझी वारी करीन आई. तुझी नवविध् भक्ती करीन. आणि माझ्या पोटी ज्ञानवान संतान मागेन आई. ज्ञान मिळाल तरी उतून मातून नाही जानार आई... हृदयात नेहमी सद्भाव ठेवीन. दंभ अहंकारा चा वाराही लागून घेणार नाही. त्रास देणाऱ्या सासऱ्या सारखा त्याचा नाश करीन आई अस जर् तू केलस् ना आई... *तर आई तुझा नियमित जोगवा मागेन आई. तुझा जोगवा मागेन*
तुझ्या नामाची समर्थ सद्गुरु कडून पूर्ण बोधाची परडीच् मागून घेइन्.. आशा तृष्णा इच्छया यांना खोल दरडीत ढ़कलुन देईन आई.. मनाला भरकटवुन देणाऱ्या विकारांची कुरवण्डी करीन आई.. आणि यासाठी तू मदत केलिस् ना आई....... *तर आई तुझा नियमित जोगवा मागेन आई. तुझा जोगवा मागेन*
हे आई तू आता पावलिस् आई.. तुझ्या गोड नामानी हृदयात हृद्यतामृत * (भातुक*) पाझरणार आहे आई त्याच्या दुरडया च्या दुरडया भरून घेइन् आता मी निसंग झालीय आई.. विकल्प नावाचा नवरा मी सोडून दिलाय आई तो की नाही खुप वेग वेगळे विकल्प तैयार करून मनाला भरकटुन टाकत असे म्हणून त्याला सोडून दील आई.. काम क्रोध ह्यांना तर झोडून मारून टाकल आई आणि अशारीतीन आई मार्ग तूच मोकळा केलायस म्हणून *आई तुझा नियमित जोगवा मागेन आई. तुझा जोगवा मागेन*
शेवटी नाथ बाबा म्हणतात की... अरे बाबानो असा मार्ग शोधून ठेवलाय. की ज्याच्यात जन्म मृत्यु च्या पलीकडे नेणारा मार्ग मिळतो की जो मार्ग चालल्यावर जन्म मरणा चा फेरा चुकवता येतो तो मी चुकवलाय आणि त्याचाच नवस फेडायला आलोय म्हणून हे *आई तुझा नियमित जोगवा मागेन आई. तुझा जोगवा मागेन*
