वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 5. सर्व आरती संग्रह › 7. देवीच्या आरत्या

जय देवी श्रीदेवी मात

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-090238 · अभंग क्र. ३

3.
जय देवी श्रीदेवी माते ।
वंदन भावे माझे तव पदकमलाते ॥ धृ. ॥
श्री लक्ष्मी देवी तूं श्री विष्णुपत्नी ।
पावसी भक्तालागी अति सोप्या यत्नी ॥
जननी विश्वाची तूं जीवनचित्श्क्ती ।
शरण तुला मॆ आलो नुरवी आपत्ती ॥ १ ॥
भृगवारी श्रद्धेने उपास तव करिती ।
आंबट कोणी काही अन्न न सेवीती ॥
गुळचण्याचा साधा प्रसाद भक्षीती मंगल व्हावे म्हणुनी कथा श्रवण करिती ॥ २ ॥
जे कोणी नरनारी व्रत तव आचरिती ।
अनन्य भावे तुजला स्मरुनी प्रार्थीती ॥
त्यांच्या हाकेला तूं धांवुनिया येसी ।
संतती, वैभव किर्ती धनदौलत देसी ॥ ३ ॥
विश्वाधारे माते प्रसन्न तूं व्हावे ।
भवभय हरुनी आम्हां सदैव रक्षावें ॥
मनिची इच्छा व्हावी परिपूर्ण सगळी ।
म्हणुनी मिलिंदमाधव आरती ओवाळी ॥ ४ ॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग