वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 7. वाराचे अभंग › 6. शुक्रवारचे अभंग

सुवेळ सुदिन तुझा गों

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073628 · अभंग क्र. ४

4.
सुवेळ सुदिन तुझा गोंधळ मांडिला वो ।
ज्ञानवैराग्याचा वरती फुलवरा बांधिला वो ।
चंद्र सूर्य दोन्ही यांचा पोत जळिला वो ।
घालुनि सिंहासन वरुते घट स्थापियेला वो ॥१॥
उदो बोला उदो सदगुरु माऊलीचा वो ॥धृ॥
प्रवृत्तीचे आणि निवृत्तीचे घालुनि शुध्द आसन वो ।
ध्येय ध्याता ध्यान प्रक्षाळिले चरण वो ।
कायावाचामने एकाविध केले अर्चन वो ।
व्दैतअव्दैतभावे दिले आचमन वो ॥२॥
भक्ति वैराग्य ज्ञान यांही पूजियेली अंबा वो
सद्रूप चिद्रूप पाहूनी प्रसन्न जगदंबा वो ।
एका जनार्दनी शरण मूळकदंबा वो ।
त्राहे त्राहे अंबे तुझा दास आहे उभा वो ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग