आम्ही तो जातीचे आहे
4.
आम्ही तो जातीचे आहे ती महार । तुम्ही तो थोर उंच वर्ण ॥१॥
अन्नपाणी देता निंदितील जन । करतील ताडण मजलागी ॥२॥
ऐकोनिया मात येरू बोले वचन । यातीस कारण नाही मज ॥३॥
माझा तू वांचवी अन्न देउनी प्राण । पुढील कारण पाहू नको ॥४॥
ऐकोनी उत्तर सोयरा उठली । घरामध्ये आली लवलाही ॥५॥
दही आणि भात घेतला वाटीभरीआणोनिया करी दिला तिने ॥६॥
बाक म्हणे हरी खावोनी तुष्टला । म्हणे माग मला देतो तुज ॥७॥
