वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › १. मंगलाचरण

नमोजि विश्वतीता।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089714 · अभंग क्र. ३

3.
नमोजि विश्वतीता।
विश्रवव्यापका श्रीअनंता।
परात्परा सद्गुरुनाथा।
ईश्रवरनियंता सकळादी ॥१॥
तुमचा अनुग्रहो झालिया।
निरसे मोह ममता माया।
करुनी उपदेश ब्रम्हया।
निजात्मपदी स्थापिसी ॥२॥
सनकादिकांचे चिंतन।
नाम तुमचे अनुसंधान।
त्याते स्वरुप स्थिती पावउन।
ठेविसी निमग्न निजानंदी ॥३॥
शुक्र प्रल्हाद नारद।
पावोनिया तुमचा बोध।
करिती सदा ब्रम्हानंद।
तारिती कीर्तने आणि‍का ॥४॥
निळा म्हणे परमानंदा।
परात्परा सच्चिदानंदा।
सद्गुरुराया निजात्मबोधा।
कृपेस्तव लाहिजे तुमाचिये ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग