वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › ३२. श्री संत निळोबारायाकृत अभंग

दासोपंतांचा अभिमान ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088664 · अभंग क्र. ३

3.
दासोपंतांचा अभिमान ।
गेला घेताचि दर्शन ॥१॥
धन्य धन्य एकनाथा ।
तुमचे चरणी माझा माथा ॥२॥
दत्तात्रय चोपदार ।
येथे उभे काठीकर ॥३॥
यवन अंगावरी थुंकला ।
प्रसाद देवुनी मुक्त केला ॥४॥
निळा शरण तुमच्या पाया ।
अनन्यभावे नाथराया ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग