वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 10. निवडक अभंग › 16. संत जनाबाई निवडक अभंग

पुण्यवंत पाताळ लोकी

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072814 · अभंग क्र. ४

4.
पुण्यवंत पाताळ लोकी नेला । दरिद्री तो भाग्यवंत केला ।
चोरट्याचा बहुमान वाढविला । कीर्तिवानाचा अपमान केला ॥१॥
धुंद झाला तुझा दरबार ॥धृ॥
वैरियासी दिधली मोक्षसिद्धि । कपटिया दिधली महानिधी ।
सेवकाच्या ढुंगा न मिळे चिंधी । चाळकासी त्रेलोक्य भावे बंदी ॥२॥
पतिव्रता ती वृथा गुंतविली । विश्या गणिका ती सत्यलोका नेली ।
कळी स्वकुळा लावियेली । यादववृंदा ही गोष्ट बरी नाही केली ॥३॥
सत्ववानाचा बहु केला छळ । कीर्तिवानाचे मारियेले बाळ ।
सखा म्हणविसी त्याचे नासी बळ । जनी म्हणे मी जाणे तुझे खेळ ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग