बांधोनिया शिखा हिशोब
4.
बांधोनिया शिखा हिशोबाचे मिसे ।
एकनाथ बैसे महाव्दारी ॥१॥
जाता मार्गावरोनि पाहे निजदृष्टी ।
होतसे कष्टी रुक्यालागी ॥२॥
स्वभावे बोलिले हास्यमुख वचन ।
प्रपंच्या कारण महादु:ख ॥३॥
निळा म्हणे ऐसा उपदेश शब्द ।
ऐकताचि बोध मना झाला ॥४॥
