पंधरा दिवसा एक एकादश
4.
पंधरा दिवसा एक एकादशी । का रे न करिसी व्रतसार ॥धृ १॥
काय तुझा जीव जातो एका दिसे । फराळाच्या मिसे धणी घेसी ॥२॥
स्वहित कारण मानवेल जन । हरिकथा पूजन वैष्णवांचे ॥३॥
थोडे तुज घरी होती उजगरे । देउळासी का रे मरसी जाता ॥४॥
तुका म्हणे का रे सुकुमार झालासी । काय जाब देसी यमदूता ॥५॥
