वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 7. संत निवृत्तीनाथ › 1. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा › १. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४ › १. संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा

रुपाचे रुपस विठ्ठल न

🙏 7. संत निवृत्तीनाथ · ABH-090103 · अभंग क्र. ३

3.
रुपाचे रुपस विठ्ठल नाम वेष । पंढरी निवास आत्माराम ॥१॥
पुंडलिक भाग्य वोळले संपूर्ण । दिन निशी कीर्तन विठ्ठल हरी ॥२॥
त्रैलोक्य उध्दरे ऐसी पव्हे त्वरे । कीर्तन निर्धारे तरणोपाय ॥३॥
पुण्य केले चोख तारिले अशेख । जनी वनी एक रुप वसे ॥४॥
वेदादिक मती ज्या रुपा गुंतती । तो आणुनि श्रीपती उभा केला ॥५॥
निवृत्तिचा सखा विठ्ठल रुप देखा । निरालंब शिखा गगनोदरी ॥६॥

अर्थ:
जगातील सर्व रुप ज्याच्या रुपामध्ये आहे असा श्री विठ्ठल तो आत्मस्वरुप परमात्मा पंढरीत राहतो. पुंडलिकाच्या भाग्याने तो साकार झाला म्हणुन रात्रंदिवस कीर्तन करण्याचा लाभ मिळाला. हेच ते कीर्तन त्रयलोकांना तारुन नेते. कीर्तनामुळे सर्व तरुन जातात व त्यांना जनी वनी तोच परमात्मा दिसु लागतो. त्या वेदांची मती ही ह्यांच्या रुपात गुंतुन पडते.तो लक्ष्मीपती पुंडलिकाने आणुन उभा केला आहे. निवृत्तिनाथ म्हणतात तो माझा सखा श्री विठ्ठल त्याचे निराकार ब्रह्म स्वरुप ज्योती स्वरुपाने गगनाच्या पोटात व्यापक स्वरुपात आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग