विभाग सत्वर वसिष्ठान
4.
विभाग सत्वर वसिष्ठाने केले । राया बोलाविले सान्निधचि ॥१॥
प्रथम तो भाग कौसल्यसी दिला । तेणे क्रोध आला कनिष्ठेसी ॥२॥
येतांचि तो क्रोध विघ्न ओढवले । मुखी झडपिला पिंड घारी ॥३॥
आसडोनी पिंड घारीने पै नेला । नामा म्हणे घातिला अंजनी करी ॥४॥
