जोडूनिया जोडी जेणे ह
4.
जोडूनिया जोडी जेणे हुंडारिली दुरी ।
भिकेची आवडी तया नावडे पंढरी ॥१॥
करंटे कपाळ ज्याचे नाम नये वाचे ।
सदैव सभाग्य तोचि हरिरंगी नाचे ॥२॥
आपण न करी यात्रा दुजियासि जावो नेदी ।
विषयाचा लंपट शिकवी कुविद्या कुबुध्दि ॥३॥
ऐसे जे जन्मोनि नर भोगिती अघोर ।
न करिती तीर्थयात्रा तया नरकी बिढार ॥४॥
पुंडलिके भक्त तारिल विश्वजना ।
वैकुंठीची मूर्ति आणिली पंढरपूर पाटणा ॥५॥
कायावाचा मने जीवे सर्वस्वे उदार ।
बापरखुमादेविवरा विठ्ठलाचा वारीकर ॥६॥
