अवचिता परिमळु झुळकला
5.
अवचिता परिमळु झुळकला अळुमाळु । मी म्हणे गोपाळु आला गे माये ।
चांचरती चांचरती बाहेरी निघाले । ठकचि मी ठेले काय करू ॥१॥
मज करा का उपचारु अधिक ताप भारु । सखिये सारंगधरु भेटवा का ॥धृ॥
तो सांवळा सुंदरु कासे पीतांबरु । लावण्य मनोहरु देखियेला ।
भरलिया दृष्टी जंव डोळा न्याहाळी । तंव कोठे वनमाळी गेला गे माये ॥२॥
बोधुनी ठेले मन तव जाले आन । सोकोनी घेतले प्राण माझे गे माये ॥
बापरखुमादेविवरु विठ्ठल सुखाचा । तेणे कायामनेवाचा वेधियेले ॥३॥
