वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 7. वाराचे अभंग › 1. रविवारचे अभंग

एके घाई खेळता न पडसी

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073680 · अभंग क्र. ४

4.
एके घाई खेळता न पडसी डाई । दुचाळ्याने ठकसील भाई रे ।
त्रिगुणांचे फेरी थोर कष्टी होसी । या चौघांची तरी धरी सोई रे ॥१॥
खेळ खेळोनिया निराळाची राही । सांडी या विषयाची घाई रे ।
येणेचि खेळे बसवंत होसी । ऐसे सत्य जाण माझ्या भाई रे ॥२॥
शिंपियाचा पोर एक खेळिया नामा । तेणे विठ्ठल बसवंत केला रे ।
आपुल्या सवंगडिया शिकवूनी घाई । तेणे सतत फड जागविला रे ।
एके घाई खेळता न चुकेचि कोठे । तया संतजन मानवले रे ॥३॥
ज्ञानदेव मुक्ताबाई वटेश्वर चांगा । सोपान आनंदे खेळती रे ।
कान्हो गोवारी त्यांनी बसवंत केला । आपण भोवती नाचती रे ।
सकळिका मिळोनि एकचि घाई । त्याच्या ब्रम्हादिक लागती पायी रे ॥४॥
रामा बसवंत कबीर खेळिया । जोडा बरवा मिळाला रे ।
पाचा संवगडिया एकचि घाई । तेथे नाद बरवा उमटला रे ।
ब्रम्हादिक सुरवर मिळोनिया त्यानी । तोहि खेळिया निवडिला रे ॥५॥
ब्राम्हणाचा पोर खेळिया एका भला । तेणे जन खेळकर केला रे ।
जनार्दन बसवंत करुनिया तेणे । वैष्णवांचा मेळ मिळविला रे ।
एकचि घाई खेळता खेळता । आपणचि बसवंत झाला रे ॥६॥
आणिक खेळिये होऊनिया गेले । वर्णावया वाचा मज नाही रे ।
तुका म्हणे गडे हो हुशारूनी खेळा । पुढीलांची धरूनिया सोई रे ।
एकचि घाई खेळता जो चुकला । तो पडे संसार डाई रे ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग